काँग्रेसच्या आमदारांमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पद सोडण्याची धमकी

लोकशाही निरर्थक ठरवणार्‍या या गोष्टी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बेंगळूरू – काँग्रेसचे आमदार मर्यादा ओलांडत आहेत. काँग्रेस नेत्यांना या आमदारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर त्यांना हेच चालू ठेवायचे असेल, तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला सिद्ध आहे, अशी धमकी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते नेते एच्.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या विरोधामुळे दिली आहे. सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांना त्यांचा मुख्यमंत्री म्हटले होते.

कुमारस्वामी यांच्या या धमकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्‍वर म्हणाले की, सिद्धरामय्या हे सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आमच्या काँग्रेस आमदारांचे नेते आहेत. आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडले आहे, यामध्ये चुकीचे काय आहे? आम्ही कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री असण्याने आनंदी आहोत.


Multi Language |Offline reading | PDF