कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेकडो लोकांसमोर महिलेच्या हातून ध्वनीक्षेपक खेचला

राजकारणात सक्रीय झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलतील का ? कि त्यांना काँग्रेस नेत्यांची ही विकृती मान्य आहे ?

बेंगळूरू – कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एक चलचित्र समोर आले आहे. यात ते शेकडो लोकांसमोर एका महिलेसमवेत गैरवर्तन करतांना दिसत आहे. ही महिला सिद्धरामय्या यांच्याकडे ‘मत दिल्यानंतर अजून आपण आमच्या मतदारसंघाच्या आमदाराला पाहिलेले नाही’, अशी तक्रार करत होती. त्या वेळी सिद्धरामय्या तिच्यावर भडकले आणि तिच्या हातातील ध्वनीक्षेपक खेचून घेतांना महिलेची ओढणीही खेचली. (जनतेच्या परखड प्रश्‍नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्याशी असभ्य वर्तन करणार्‍यांना जनतेने निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी ! – संपादक) हे चलचित्र प्रसारित झाल्यानंतर अद्याप सिद्धरामय्या यांनी क्षमा मागितलेली नाही. यावर सिद्धरामय्या यांनी कोणतेही गैरवर्तन केले नसल्याचे महिलेने सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF