पाकिस्तानमध्ये आणखी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करून मुसलमानासमवेत निकाह लावून दिला

पाकमध्ये कधीही अल्पसंख्यांक हिंदु, शीख आदींचे रक्षण होऊ शकणार नाही, याउलट भारतामध्ये अल्पसंख्यांक मुसलमान अधिक उद्दाम झाले आहेत, हे मात्र निश्‍चित सांगता येईल !

कराची – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रहाणार्‍या १६ वर्षीय हिंदु मुलीचे मुसलमानांनी अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि तिचा एका मुसलमान व्यक्तीशी निकाह लावून दिला. (पाकिस्तानच्या सैन्याचे कळसूत्री बाहुले असणारे पंतप्रधान इमरान खान यांनी काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘अल्पसंख्यांकांचे रक्षण कसे करायचे, हे आम्ही दाखवून देऊ’ असे म्हटले होते; मात्र ती केवळ त्यांची पोपटपंचीच होती, हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे. – संपादक) या घटनेचा पाकिस्तानमधील सामाजिक संघटनांनी निषेध केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now