‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक, राजकीय संपादक यांच्यासह माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात मानहानीचा दावा

चर्चासत्राच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांना शिवराळ भाषा वापरल्याचे प्रकरण

श्री. सुनील घनवट

पुणे – ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर २२ ऑगस्ट या दिवशी ‘सनातन रडार’वर या ‘लक्षवेधी’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील हे सहभागी झाले होते. या चर्चासत्रात बी.जी. कोळसे पाटील यांनी श्री. सुनील घनवट यांना उद्देशून हिंदुद्वेषापोटी अवमानकारक वक्तव्ये केली. श्री. घनवट यांनी कोळसे पाटील, तसेच चर्चासत्राचे निवेदक आणि वृत्तवाहिनीचे राजकीय संपादक आशिष जाधव यांना ती वक्तव्ये चुकीची असल्याची जाणीव करून दिली, तसेच त्याविषयी क्षमा मागण्यास सांगितली; मात्र त्याची नोंद न घेता कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये चालूच ठेवली. या संदर्भात पुणे येथील दिवाणी न्यायालयात १० लाख रुपयांच्या हानीभरपाईचा दावा प्रविष्ट करण्यात आला आहे. ७ मार्च २०१९ ला न्यायालयात उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने प्रतिवादी आशिष जाधव आणि बी.जी. कोळसे पाटील यांना दिला आहे. श्री. सुनील घनवट यांच्या वतीने अधिवक्ता मोहनराव डोंगरे काम पहात आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे,

१. ‘सनातन रडार’वर या चर्चासत्रात बी.जी. कोळसे पाटील यांनी हिंदुद्वेषाच्या उमाळ्यातून श्री. सुनील घनवट यांच्यावर मनमानी आरोप करत ‘भटुकड्यांनो, अरे भटांनो, तुम्ही देशाचे वाटोळे केले आहे. या आश्रमाला पैसे येतात कुठून ? सगळे गरिबांचे पैसे आहेत.

तुम्हाला लाज वाटली पाहिजे हरामखोरांनो ! तुम्ही जगात नीच आहात. अरे हरामजाद्या, मेंदू सडवतो…’ अशा स्वरूपाची शिवराळ आणि असभ्य भाषा वापरली. (माजी न्यायमूर्ती असूनही असभ्य वर्तन करणारे कोळसे-पाटील ! त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कसे निकाल दिले असतील, त्याचा यावरून अंदाज येतो. – संपादक)

२. श्री. सुनील घनवट यांनी या प्रसंगी ‘ही सर्व वक्तव्ये अयोग्य असून त्याविषयी कोळसे पाटील यांनी क्षमा मागितली पाहिजे, तसेच आशिष जाधव यांनी तसे कोळसे पाटील यांना सांगितले पाहिजे’, अशी भूमिका मांडली.

३. त्यावर आशिष जाधव यांनी ‘त्यांना माफी मागायला सांगणारा मी कोण ? कोळसे-पाटील हे तुमच्या आमच्यापेक्षा राज्यघटनेचे अधिक अभ्यासक आहेत’, असे म्हणत एकप्रकारे कोळसे-पाटील यांच्या अवमानकारक वक्तव्यांचे समर्थन केले. (चुकीचे घडत असल्याचे दिसूनही ते न थांबवणारे अन् त्याला पाठिंबा देणारे संपादक नि:पक्ष आणि जनतेला दिशा देणार्‍या चर्चा काय घडवून आणणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF