कल्याण येथे कारागृहात महिला बंदीवानाची आत्महत्या !

बंदीवानांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर !

कल्याण – येथील आधारवाडी कारागृहात साक्षी उपाख्य वैशाली शैलेश निमसे या ३४ वर्षीय महिला बंदीवानाने दोरीच्या साहाय्याने २७ जानेवारीला आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पतीची प्रियकरासमवेत हत्या केल्याच्या प्रकरणी आरोपी महिला एक वर्षापासून आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत होती. (बंदीवानांच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ! – संपादक) उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात वैशालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF