गेल्या वर्षभरात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३९ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे सोने, तर १० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त

या माहितीवरून तस्कर किती बोकाळले आहेत, हे लक्षात येते ! या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून कडक शिक्षा करणे आवश्यक आहे !

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) वर्षभरात अनुमाने १३९ कोटी ९५ लाख रुपये मूल्याचे ५०९ किलो ३२ ग्रॅम सोने जप्त केले आहे, तसेच १० कोटी ६७ लाख रुपयांचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये २७९ आरोपींना अटक करण्यात आली. सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एआययू’ युनिटच्या वतीने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. दुबई आणि इतर आखाती देशांतून येणार्‍या विमानांमधील प्रवासी सोन्याची आयात करतांना, त्याचे सीमाशुल्क भरण्यास टाळाटाळ करतात. यासाठी विविध क्लृप्त्या अवलंबून सोने तस्करी केली जाते. अनेकदा सोने बिस्किटाच्या रूपात आणले जाते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now