मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना लोकशाहीची शपथ !

केवळ शपथेची औपचारिकता उपयोगाची नाही. त्याप्रमाणे कृतीही हवी !

मुंबई – देशातील समृद्ध लोकशाही परंपरेचे जतन करून मुक्त, नि:पक्षपाती, निर्भय आणि शांततापूर्ण मार्गाने संसदीय लोकशाहीतील निवडणुकांचे प्रावित्र्य राखण्यात येईल, अशा आशयाची शपथ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी २५ जानेवारीला घेतली. राष्ट्रीय मतदारदिनाचे निमित्त साधून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्याचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक यांनी ही शपथ दिली.


Multi Language |Offline reading | PDF