कल्याण येथे शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकारांचा सत्कार

सहस्रो शिवसैनिकांना दिले ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे निमंत्रण !

कल्याण – येथील भगवा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला त्यांच्या स्मारकाजवळ शहर शाखेच्या वतीने व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवून आणि व्यंगचित्रकारांचा सत्कार करून शिवसेनाप्रमुखांना अनोखी मानवंदना देण्यात आली. व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. विनीता राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपनेते श्री. नितीन बानगुडे पाटील यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनाप्रमुखांची संपूर्ण प्रतिमाच उभी केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस यांनी उपस्थितांना कल्याणमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे निमंत्रण दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now