चिनाब नदीवरील प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी पाकचे पथक भारतात येणार

  • पाकच्या पथकाने हे प्रकल्प कसे नष्ट करायचे, याचा अभ्यास केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • एकीकडे चीन ब्रह्मपुत्रा नदीवर विविध प्रकल्प उभारत असल्यामुळे भारताला होणार्‍या हानीविषयी भारताने चीनकडे तक्रार केल्यावर चीनने भारताला दाद दिली नव्हती कि भारताला हे प्रकल्प पहाण्यासाठी आमंत्रित केले नव्हते, तर दुसरीकडे भारत शत्रूराष्ट्र पाकला भारतातील नदीवर होणार्‍या प्रकल्पांना भेट देण्यासाठी अनुमती देऊन काय साध्य करू पहात आहे ? असे राष्ट्रघातकी निर्णय घेणारे शासनकर्ते देणारी लोकशाही काय कामाची ?

नवी देहली – काश्मीरमधील चिनाब नदीवरील जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी पाकिस्तानचे ३ जणांचे एक पथक २७ जानेवारी या दिवशी भारतात येणार आहे. ‘ही भेट दोन्ही देशांतील जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या संबंधित सूत्रांमधील समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची आहे’, असे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाक यांचे सरकार यांच्यात गेल्या वर्षी या संदर्भात चर्चा झाली होती. (अनेक वाईट अनुभव येऊनही जर भारत अजून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची सवय सोडत नसेल, तर भारताची हानी कोणी रोखू शकत नाही ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now