शबरीमला येथील अय्यप्पा मंदिराच्या प्रथा आणि परंपरा यांचा सन्मान करा !

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ ला दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भगवान अय्यप्पा यांच्या लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी मंदिराच्या परंपरारक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी करून सनदशीर माध्यमांतून निषेध नोंदवला. या आंदोलन करणार्‍या भक्तांपैकी ३ सहस्र ५०० हून अधिक भक्तांना केरळ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट केले. वैध मार्गाने आंदोलन करणार्‍या भक्तांवर गुन्हा नोंद होणे आणि त्यांना अटक होणे, हे दुर्दैवी अन् निषेधार्ह आहे. हिंदूंच्या धार्मिक परंपरांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करतांना लक्षावधी भक्तांच्या भावनांचाही विचार व्हायला हवा.

शबरीमला मंदिरातील प्रवेशासाठी धर्मपरंपरेवर केलेले आघात !

२० ऑक्टोबर २०१८- भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला.

२१ ऑक्टोबर २०१८ – मागासवर्गीय संघटनेची पदाधिकारी एस्.पी. मंजू (वय ३८ वर्षे), मेरी स्विटी (वय ४६ वर्षे) यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

२२ ऑक्टोबर २०१८ – बिंदु थँक कल्याणी यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

२३ डिसेंबर २०१८ – ‘मानिथी’ संघटनेच्या प्रमुख सेलव्ही आणि या संघटनेच्या ३० महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

२ जानेवारी २०१९ – हिंदुद्वेषी साम्यवादी केरळ सरकारच्या पाठिंब्याने बिंदू आणि कनकदुर्गा या अनुक्रमे ४२ आणि ४४ वर्षांच्या महिला शबरीमला येथील अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात घुसल्या आणि प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी त्यांनी शेकडो वर्षांची हिंदूंची धर्मपरंपरा लाथाडली !

हिंदूंच्या मंदिरात जाण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती महिलांनी आंदोलन करून कायदा सुव्यवस्था वेठीस धरणे, हे अत्यंत गंभीर आणि जाणीवपूर्वक दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी केलेल्या षड्यंत्राचाच भाग आहे.

हिंदूंनो, धर्मशास्त्र जाणून घ्या आणि इतरांना सांगा !

१. मंदिरे ही ईश्‍वरी चैतन्य आणि सात्त्विकता यांचा स्रोत असतात. मासिक पाळीच्या काळात स्त्रीचा रजोगुण वाढलेला असतो. मासिक पाळीच्या काळात स्त्रिया मंदिरांसारख्या सात्त्विकतेचा, ऊर्जेचा, शक्तीचा स्रोत असलेल्या ठिकाणी गेल्यास महिलांच्या ओटी पोटावर त्याचा परिणाम होऊन त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. मंदिरातील सात्त्विकता त्यांना सहन न झाल्यासही त्यांना त्रास होऊ शकतो.

२. शबरीमला येथील अय्यप्पा हे ब्रह्मचारी असल्यामुळे मंदिराच्या गर्भगृहातील शक्ती अधिक आहे. त्याच्या प्रभावात वारंवार आल्याने प्रजननक्षम महिलांमध्ये असलेल्या नैसर्गिक सृजनशक्तीत असंतुलन निर्माण होऊ शकते. यावरून महिलांचा विचार करून धर्माने काही नियम घातले आहेत, हे लक्षात येईल.

३. हिंदु धर्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग, कर्मयोग आदी ईश्‍वरप्राप्तीचे विविध मार्ग सांगितले आहेत. यातील कर्मकांडानुसार साधनाही एक मार्ग आहे. ज्या साधनामार्गाचा आपण अवलंब करू, त्या त्या साधनामार्गानुसार आपल्याला त्याचे घालून दिलेले नियम, शास्त्र यांचे पालन करणे आवश्यक असते. त्यांचे पालन केल्यासच केलेल्या साधनेचा किंवा उपासनेचा व्यक्तीला लाभ होतो. मंदिरे हिंदूंची चैतन्य देणारी केंद्रे आहेत. या मंदिरांत धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधींनुसार कृती केल्या तर मंदिरातील ईश्‍वरी चैतन्य आणि सात्त्विकता टिकून रहाते आणि वाढीस लागते. व्यवहारातही जसे शस्त्रक्रियागृहात निर्जंतुकीकरण केले असल्याने कोणालाही सरसकट प्रवेश दिला जात नाही. पादत्राणेही काढावी लागतात. मास्क, डोक्यावरील टोपी, अ‍ॅप्रन आदी घालून डॉक्टरांना प्रवेश असतो. तिथे कोणीही विरोध करत नाही. तसेच हे आहे.

४. शबरीमला मंदिरात प्रवेशापूर्वी ४१ दिवसांचे अखंड व्रत करावे लागते. व्रत हे कर्मकांडांतर्गत साधनेत येत असल्याने त्याविषयीचे नियम पाळले तर त्याचे फळ मिळू शकते. मासिक पाळीच्या काळात हे व्रत करू शकत नसल्याने १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना ४१ दिवस अखंड हे व्रत करणे शक्य होत नाही.

५. मंदिरातील रजोगुण वाढल्यास त्या ठिकाणचा सत्त्वगुण न्यून होऊ शकतो. मंदिरातील सात्त्विकतेचा लाभ संपूर्ण समाजाला होत असतो. त्यामुळे ती टिकवून ठेवणे सर्वांचेच कर्तव्य नव्हे का ? मंदिरातील सात्त्विकता न्यून झाल्यास सर्वांचीच हानी होऊ शकते. हा धर्माचा व्यापक विचार आहे.

धर्माने सांगितलेले नियम हे महिलांच्या हितासाठीच आहेत, हे यावरून लक्षात येईल !

शबरीमला मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण धर्मशास्त्र समजून घ्या !

१. शबरीमला येथे चालू असलेली प्राचीन परंपरा ही सनातन वैदिक धर्माच्या परंपरेचा भाग आहे. शबरीमला मंदिरात असलेली ही परंपरा ‘या मंदिरातील देवता ‘शास्ता’ (भगवान अय्यप्पा) ही ब्रह्मचर्याचे पालन करणारी आहे’, या धर्मशास्त्रीय तत्त्वावर आधारित आहे. देशभरातील अन्यत्र असलेल्या भगवान अय्यप्पा यांच्या मंदिराहून शबरीमला येथील मंदिर भिन्न आहे. तेथे भगवान अय्यप्पा ‘धर्मशास्ता’ म्हणून पूजले जातात.

२. केरळमध्ये भगवान अय्यप्पा यांची ४ प्रमुख मंदिरे आहेत. तिथे भगवान अय्यप्पा यांची ४ रूपे आहेत. कुलातुपुळा येथे बाल, शबरीमला येथे ब्रह्मचारी, अचनकोविल येथे भार्यासमवेत आणि आर्यानकोवू येथे संन्यासी रूपात भगवान अय्यप्पा प्रतिष्ठित आहे. जेथे भगवान अय्यप्पा ब्रह्मचारी म्हणून प्रतिष्ठित आहेत, ते शबरीमला सोडून बाकी तीनही, तसेच जगातील इतरही अय्यप्पा मंदिरांत महिलांच्या प्रवेशावर कोणतेही निर्बंध नाहीत.

३. शबरीमला येथील मंदिरातही केवळ १० ते ५० या वयोगटातील महिलांनाच प्रवेशासाठी अनुमती नाही. त्यामुळे सरसकट महिलांना अनुमती नाही, असा अपप्रचार चुकीचा आहे.

४. भारतातील अन्य सहस्रो मंदिरात अशा प्रकारचा नियम नाही. हा नियम या विशिष्ट मंदिराला आहे. तो पाळण्यात काय अडचण आहे ? महिलांनी अन्य मंदिरांत जाऊन दर्शन घ्यावे.

मान्यवर काय म्हणतात…?

१. शबरीमला मंदिर हे भगवान श्री अय्यप्पाचे निवासस्थान आहे; अश्‍लीलतेचे ठिकाण नव्हे ! – प्रयार गोपालकृष्णन्, ‘त्रावणकोर देवास्वम् मंडळा’चे माजी अध्यक्ष

२. शबरीमला मंदिरात केवळ हिंदूच नव्हे, तर अन्यही धर्मातील लोक मंदिराच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे सर्व जण चिंतीत आहेत. रेहाना फातिमा यांना संरक्षणात घेऊन जातांना त्यांना पोलिसांची वर्दी घालण्यात आली होती. हे सर्वथा अयोग्य आहे. – काँग्रेसचे नेते आर्.आर्. चेन्नीथल्ला

३. प्रत्येक मंदिराच्या काही प्राचीन प्रथा-परंपरा असतात. अनंत काळापासून भाविक त्याचे मोठ्या श्रद्धेने पालन करत असतात. त्यामुळे त्या प्रथा-परंपरांत कोणीही हस्तक्षेप करू नये, अशी माझी नम्र सूचना आहे – रजनीकांत, सुप्रसिद्ध अभिनेते

हिंदूंनो, हिंदुद्वेषी स्त्रीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना हे सांगा !

१. गेल्या काही वर्षांत हिंदूंचे धार्मिक विधी, मंदिरे, प्रथा-परंपरा आदींवर घाला घालण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांकडून स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली हेतूतः लैंगिक भेदभावाचा रंग देऊन समाजाची दिशाभूल केली जात आहे. वास्तविक धार्मिक परंपरा आणि लैंगिक भेदभाव यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

२. समानतेचे डिंडोरे पिटणार्‍यांनी सांगावे की, पुरुषांना मुले होऊ शकतात का ? स्त्री-पुरुष यांच्या मुलतः असलेले शारीरिक, मानसिक भेद हे कायम रहाणार आहेतच.

३. आपल्या हाताची पाच बोटेही सारखी नसतात. विश्‍वातील लोकसंख्येपैकी एक व्यक्ती कधीच दुसर्‍यासारखी नव्हती, नाही आणि नसेल. निसर्गात काहीच समान नसते. झाड, प्राणी सर्व भिन्न असतात. असे असतांना समानतेच्या गोष्टी करणे हे अतिशय हास्यास्पद आणि बालीश आहे.

४. रेल्वेमध्ये महिलांना वेगळा डबा आरक्षित असतो, बसमध्ये काही जागा महिलांसाठी राखीव असतात, निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षित जागा असतात, इतकेच काय ते सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणीही स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी सुविधा असते. महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळ्या रांगाही असतात. या सर्व गोष्टींमध्ये महिलांवर अन्याय होत आहे, असे आपण म्हणत नाही; याचे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, हे महिलांच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी, सोयीसाठी आहे; परंतु मंदिरप्रवेशाविषयी मात्र ‘लिंगभेद आहे’, असे म्हटले जाते. हे अयोग्य असून धार्मिक परंपरांमागील धर्मशास्त्रीय कारणांचा विचार काय आहे, हे पाहिले पाहिजे.

५. ‘समानता’ ही संकल्पना दुसर्‍यांवर अन्याय करायला सांगणारी, अहिंदूंच्या पाश्‍चात्त्य देशात उगम पावलेल्या साम्यवादातून आली आहे; याउलट लक्षावधी वर्षांची परंपरा असणार्‍या विश्‍वव्यापी हिंदु धर्मात ‘शिव-शक्ती हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत’, ही संकल्पना आहे.

६. काँग्रेस आणि डावे हे एकीकडे लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय यांविषयी मोठमोठ्या गप्पा मारतात; मात्र दुसरीकडे तीन तलाकविरोधी कायद्याला कडाडून विरोध करतात.

७. एकीकडे तीन तलाक, हलाला यांसारख्या कुप्रथांविषयी गप्प रहायचे, लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांविषयी अवाक्षरही काढायचे नाही आणि दुसरीकडे हिंदूंच्या प्रथा पायदळी तुडवण्याचे समर्थन करायचे, हा कसला परिवर्तनवाद ?

८. धर्मनियम तोडून नेमकी कुठली स्त्रीमुक्ती साधणार आहे ? यामुळे महिलांवरील अत्याचार थांबणार आहेत का ?

९. नास्तिक असलेले सीपीआई (एम्)वाले देवाविषयी का बोलत आहेत ? त्यामुळे हा केवळ हिंदुद्वेषापोटी केलेला स्टंट होता, हेच लक्षात येते.

पुरो(अधो)गाम्यांनो, धर्मातील स्त्रीचे स्थान केवळ ‘समानतेचे’ नव्हे, तर त्याहीपेक्षा आदराचे म्हणजेच ‘पूजनीय’ आहे, हे जाणा !

१. सनातन वैदिक धर्मात ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ म्हणजे ‘जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.’ असे वचन आहे.

२. हिंदु धर्म आणि परंपरा यांनी जेवढा महिलांचा विचार केला आहे, तेवढा अन्य पंथांमध्ये नाही. हिंदु धर्मात महिलांना देवीचे स्थान असून तिची पूजा केली जाते. हिंदूंमध्ये स्त्री देवतांची संख्या अधिक आहे. कोणताही कौटुंबिक धार्मिक विधी हा पत्नी सोबत असल्याविना पूर्ण होऊ शकत नाही. अनेक धार्मिक विधी, उदा. हरतालिका पूजन, कुमारिका पूजन यांमध्ये महिलांचे पूजन केले जाते. अशा अनेकविध गोष्टींतून हिंदु धर्मात स्त्रियांना असलेले अनन्य साधारण स्थान लक्षात येते.

त्यामुळे साम्यवाद्यांनी हिंदूंना स्त्री-पुरुष समानता शिकवणे हास्यास्पद आहे !

धर्माभिमान जागृत ठेवणारी ‘रेडी टू वेट’ मोहीम

‘पीपल फॉर धर्म’च्या अध्यक्षा शिल्पा नायर यांनी ‘हिंदु पोस्ट’ वेबपोर्टलवर काही महिन्यांपूर्वी ‘रेडी टू वेट’ (वाट पहाण्यास सिद्ध) नावाचे एक ऑनलाईन अभियान चालू केले.

‘आमच्या परंपरांचे दुसर्‍यांनी रक्षण करण्याऐवजी, आम्ही महिला भक्तांनीच आता पुढे येऊन आमच्या परमेश्‍वराच्या आदेशाचे पालन करण्याचा संकल्प सोडला पाहिजे. त्यातूनच या ‘रेडी टू वेट’ नावाच्या अभियानाचा जन्म झाला. ‘मंदिरातील प्रवेशासाठी वयाची पन्नाशी गाठेपर्यंत थांबण्यास सिद्ध आहोत’, अशी इच्छा प्रदर्शित करणार्‍या लाखो महिलांनी या अभियानात सहभागी होऊन हिंदु धर्मावर कावळ्यांप्रमाणे तुटून पडणार्‍या बुद्धीवाद्यांना चकित केले. ‘ज्यांना केरळच्या मंदिरातील विशिष्ट परंपरांचे कणभरही ज्ञान नाही, अशा काही महिलांनी म्हणावे की, ‘समानता आणण्यासाठी या परंपरांना नष्ट करा’, तर आम्हाला आमच्या धर्माने दिलेले विशिष्ट अधिकार आम्ही का म्हणून सोडावे ?’, असे शिल्पा नायर यांनी म्हटले आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या मागण्या !

१. घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हिंदूंना आणि त्यांच्या मंदिरांना आहे. त्या अधिकारावर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही, याची दक्षता घेणे शासनाचे कर्तव्य आहे. या दृष्टीने जसे यापूर्वी शाहबानो प्रकरणी तत्कालीन काँग्रेस सरकारने, तसेच सध्या एस्.सी./एस्.टी. अ‍ॅक्टसंदर्भात विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पालटून नव्याने कायदे बनवले; त्याप्रकारे सध्या हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर तथाकथित सेक्युलरवाद्यांकडून केले जाणारे आघात रोखण्यासाठी आणि हिंदु धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा करावा.

२. अटक केलेल्या ३ सहस्र ५०० आंदोलनकर्त्या भक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावे.

३. अहिंदूंकडून हिंदूंच्या धार्मिक गोष्टींत लुडबूड केल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आली, तसेच सामाजिक अशांतता निर्माण झाली. रेहाना फातिमा यांना ‘फेसबूक’वर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी नुकतीच अटक केली आहे. कविता जक्कल आणि मेरी स्वीटी यांनाही तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

इतर सहस्रो महिलांनी मात्र प्रथा-परंपरांचे पालन करण्यास प्राधान्य दिल्याचे निदर्शनास आले. (यावरून हिंदू त्यांच्या धार्मिक परंपरा पाळण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सिद्ध होते ! सर्वत्रच्या हिंदूंसाठी हा आदर्शच होय ! – संपादक)

हे घटनात्मक आणि न्यायालयीन वास्तव जाणा !

१. संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, तसा तो हिंदूंना आणि त्यांच्या मंदिरांनाही आहे. या निर्णयामुळे हिंदूंच्या धर्मपालनाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

२. शबरीमला मंदिरातील परंपरेला विरोध आहे, यासाठी देशभरातील एकाही महिला भक्ताने न्यायालयात याचिका केली नाही; तर नौशाद उस्मान खान या मुसलमान व्यक्तीने केलेल्या हिंदूंच्या धार्मिक परंपरेशी संबंधित याचिकेवरून न्यायालयाने हिंदूंची ८०० वर्षांची परंपरा मोडीत काढली. याच वेळी एका हिंदु याचिकाकर्त्याने मशिदींमध्ये मुसलमान महिलांना प्रवेश मिळण्यासाठी केलेली याचिका मात्र न्यायालयाने फेटाळून लावली, हे अनाकलनीय आणि न्यायालयीन धार्मिक भेदभावाचे वास्तव आहे.

३. शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करणार्‍या १९ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

४. शबरीमला मंदिरातील प्रवेशाच्या वेळी ५ न्यायाधिशांच्या खंडपिठातील महिला न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी प्रवेशाला विरोध केला होता. एका महिला न्यायाधिशाने विरोध केला. हा पुरुषी निर्णय आहे, असे म्हणणे जितके चुकीचे ठरेल, तितकेच ‘स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे’, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

५. डान्सबारमुळे खरे तर महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असते. एकीकडे न्यायालय मंदिरात जाणार्‍या महिलांना सुरक्षितता पुरवा, असे म्हणते. डान्सबारना अनुमती देतांना त्या महिलांना सुरक्षितता देण्याचा विचार होत नाही, असे समाजाला वाटते.

६. विवाहबाह्य संबंधांना न्यायालयाने मान्यता दिली आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेही घडत आहेत, हे वास्तव आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे कित्येक स्त्रियांवर अत्याचार होतो, अशी वस्तुस्थिती असतांना या स्त्रियांच्या संवेदनशील सूत्रांविषयी कुणीच काही बोलत नाही.

७. हिंदु महिला आणि मुसलमान पुरुष यांच्या विवाहातून निर्माण झालेल्या संततीचा पित्याच्या संपत्तीवर अधिकार आहे; मात्र त्या हिंदु महिलेला पतीच्या संपत्तीत वाटा मिळू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. येथे त्या महिलेवर अन्याय होतो, असे पुरो(अधो)गामी आणि स्त्रीवादी यांना वाटत नाही का ?

कथित स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर निशाणा साधला जात आहे.

पंतप्रधानांनी हिंदूंवरील आघात रोखणे अपेक्षित आहे !

शबरीमला प्रकरणी काँग्रेसचे धोरण दुटप्पी आहे. कम्युनिस्ट पक्ष भारताचा इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सन्मान करत नाही; परंतु त्याच्याकडून द्वेषपूर्ण वर्तनाची अपेक्षा नव्हती. केरळ सरकारने केलेले द्वेषपूर्ण वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद आहे !
– पंतप्रधान नरेंद्र मोदी

रथयात्रा काढून वेळ आणि पैसा व्यय करण्यापेक्षा धर्मपरंपरांच्या पालनासाठी केंद्रात सत्ता असलेल्या भाजप सरकारने थेट अध्यादेश काढायला हवा !

केरळ सरकारच्या विरोधात भाजपने ‘शबरीमला संरक्षण रथयात्रा’ काढली !


Multi Language |Offline reading | PDF