थोर राष्ट्रपुरुषांसह क्रांतीसूर्यांना अपेक्षित प्रजासत्ताकदिन हिंदु राष्ट्रातच असेल खरा ।

श्री. दत्तात्रेय रघुनाथ पटवर्धन

प्रजासत्ताकदिन वर्धापन अजि सत्तरावा आहे ।
कसे चित्र दिसते प्रजासत्ताक भारताचे अंतर्मुख होऊनी पाहे ॥ १ ॥

प्रतिवर्षी नवनवीन समस्या येऊन जुन्या समस्या तशाच रहाती ।
ब्रिटीशकालीन नियम-कायदे अजूनी मारिती अमुच्या माथी ॥ २ ॥

ब्रिटिशांच्या क्रिकेट खेळाचे अन् इंग्रजीचे कौतुक आम्हाला ।
सर्वोच्च अमुची संस्कृती असूनही त्याची नाही कदर आम्हाला ॥ ३ ॥

निवडणुका झाल्या अद्यापपर्यंत सर्वसाधारण बारा-तेरा ।
काय मिळाले या लोकशाहीतून सर्वार्थाने वाजले तीन-तेरा ॥ ४ ॥

घटनेचे शिल्पकार आंबेडकरांचे आरक्षणाचे सूत्र आठवा ।
नुसते गुणगान अन् छायाचित्रे लावूनी कशाला करता देशभक्तीचा कांगावा ॥ ५ ॥

आंबेडकर नि गांधीजी राजकारण्यांना सोयीनुसार आठवती ।
सत्तेच्या स्वार्थासाठी हे त्यांच्या तत्त्वांना तिलांजली देती ॥ ६ ॥

फाळणीची जखम अजूनही भळभळत वहात आहे ।
हिंदुबहुल भारतातील हिंदू राममंदिरासाठी धावाधाव करत आहेत ॥ ७ ॥

कुणीही उठून देवळात घुसती अन् देवभक्तीचे अवडंबर करती ।
अशा भ्रष्ट नि धर्मद्रोह्यांना न्यायाधीश तात्काळ न्याय देती ॥ ८ ॥

धर्मनिरपेक्षता नि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने शिखर गाठले आहे ।
ते हिंदु धर्म अन् हिंदूंना नष्ट करू पहात आहेत ॥ ९ ॥

हिंदुबहुल भारतातील हिंदु प्रजेचीच धर्म-संस्कृती संकटात आहे ।
प्रजासत्ताक भारतातील बहुसंख्य प्रजा त्यामुळे अतीव दुःखी आहे ॥ १० ॥

धर्म-संस्कृतीविना विकास म्हणजे प्राणाविना शरीर ।
धर्म-संस्कृतीसह विकास म्हणजे व्यक्तीसह राष्ट्रोद्धार ॥ ११ ॥

भारत देशाच्या नरेंद्रा (टीप १) अन् महाराष्ट्राच्या देवेंद्रा (टीप २) ।
कृपया वळू दे आपुली या समस्यांकडे तंद्रा ॥ १२ ॥

थोर राष्ट्रपुरुषांसह क्रांतीसूर्यांना मानाचा करतो मुजरा ।
त्यांना अपेक्षित प्रजासत्ताकदिन हिंदु राष्ट्रातच असेल खरा ॥ १३ ॥

टीप १ – पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी

टीप २ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

– आपला सर्वांचा कृपाभिलाषी,

– श्री. दत्तात्रेय रघुनाथ पटवर्धन, माणगांव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१९.१.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now