राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या उपक्रमांना सहकार्य करा !

प्राथमिक शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाचे सुयश !

सांगली, २४ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी, तसेच भावी पिढी राष्ट्राभिमानी होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या १७ वर्षांपासून प्रयत्नरत आहे.  त्यात व्याख्याने आणि प्रश्‍नमंजुषा, हस्तपत्रकांचे वाटप, फ्लेक्स-होर्डिंग लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणे असे उपक्रम राबवले जातात. तरी हे उपक्रम शाळांमध्ये राबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करावे, असे पत्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षण अधिकार्‍यांना पाठवले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नुकतेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास हिंदु जनजागृती समितीने निवेदन दिले होते. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वरील पत्र पाठवले आहे.

या संदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या संदर्भातील पत्र जोडले आहे. सदर पत्राचे आणि पत्रातील सूचनांचे अवलोकन करून आपल्या अधिनस्त असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापकांना कळवण्याची कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now