‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे संपादक, मालक आणि संचालक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

श्री. अभय वर्तक

फोंडा (गोवा) – ‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवर २६ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘कोण कोण अंडरग्राऊंड?’ या मथळ्याखाली ‘अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन आणि इतर संशयित देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे’, असे धादांत खोटे वृत्त प्रसारित करून त्यांची मानहानी केली होती. त्यामुळे श्री. अभय वर्तक यांची नाहक अपकीर्ती झाल्याने त्यांनी अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध करणारे ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे मालक टीव्ही ९ मिडीया प्रा. लि., मुख्य संपादक रंजीत कुमार जम्मीगुम्पुला आणि संचालक क्लिफर्ड परेरा यांच्या विरोधात १० लाख रुपये हानीभरपाईच्या मागणीचा दिवाणी दावा कल्याण येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

श्री. अभय वर्तक यांच्याकडून उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून १० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. अभय वर्तक यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते विवेक भावे, अशोक अवस्थी आणि किशोरी कुलकर्णी यांच्यामार्फत  मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF