‘मनुस्मृति’ जाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करावी !

राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्ते बहुसंख्य हिंदूंच्या धर्मभावनांचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत का ? यासाठीच सहिष्णु हिंदूंना हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागते, हे शासनकर्ते आणि पुरो(अधो)गामी यांनी लक्षात घ्यावे !

पंढरपूर, २३ जानेवारी (वार्ता.) – देवता, संत, हिंदु धर्मग्रंथ यांचे विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा, तसेच केवळ राजकीय स्वार्थासाठी ‘मनुस्मृति’ धर्मग्रंथ जाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आक्षेपार्ह लिखाण आणि वक्तव्य करून राजकीय स्वार्थ साधत आहेत. छगन भुजबळ यांनी अन्य धर्मियांच्या मतांसाठी ‘मनुस्मृति’ जाळून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अन्यत्र चाललेल्या धर्मविरोधी घटनांना त्यांचे प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी अन्य ठिकाणी झालेल्या विटंबनेच्या घटनांचा संबंध कुणासमवेत आहे, याची चौकशी करावी आणि छगन भुजबळ यांच्यावर त्वरित कारवाई करावी.


Multi Language |Offline reading | PDF