प्रजासत्ताकदिनानिमित्त राजधानी देहलीत कडेकोट बंदोबस्त

देहलीत ५० सहस्र सैनिक तैनात

स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही प्रजासत्ताकदिन कडेकोट बंदोबस्तात साजरा करावा लागतो, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – २६ जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताकदिनानिमित्त राजधानी देहली येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देहली पोलिसांच्या समवेत ५० सहस्र सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच विजय चौकापासून ते लाल किल्ल्यापर्यंत ६०० सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्यात आले आहेत.

चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी देहलीला २८ भागांमध्ये विभागण्यात आले असून वरिष्ठ पोलिसांना त्याचे दायित्व देण्यात आले आहे. ‘नवी देहलीतील मुख्य बाजार, रेल्वेस्थानके, ‘मेट्रो स्टेशन’, विमानतळ, बसस्थानके, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे येथे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे’, अशी माहिती देहली पोलिसांचे प्रवक्ते मधुर वर्मा यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF