शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांकडून हकालपट्टी

  • एका धर्माचरणी हिंदूला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने सहस्रो वर्षांची धार्मिक परंपरा तोडल्याचे कृत्य कसे सहन होईल ? या उद्वेगातून झालेल्या या कृतीस उत्तरदायी कोण ?
  • अधर्मी कृत्य घराघरांत भांडणाचे निमित्त ठरते, हेच या घटनेवरून स्पष्ट होते ! यास्तव हिंदूंनी धर्माचरणी असणेच आवश्यक आहे !

थिरूवनंतपूरम् – शबरीमला येथील श्री अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांनी घरातून हकालपट्टी केली. या प्रकरणी कनकदुर्गा यांनी कुटुंबियांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

कनकदुर्गा या सध्या पोलिसांच्या ‘शेल्टर होम’मध्ये वास्तव्य करत आहेत. २ जानेवारी या दिवशी कनकदुर्गा आणि अन्य एका महिला यांनी अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करून मंदिराची परंपरा मोडली होती. त्यानंतर एक आठवड्यापूर्वी मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी कनकदुर्गा यांना त्यांच्या सासूने मारहाणही केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now