दैनिक ‘पुढारी’चे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

श्री. रमेश शिंदे

फोंडा (गोवा) – ‘पुढारी’ (मुंबई आवृत्ती) या मराठी दैनिकाच्या २१ ऑगस्ट २०१८ या दिवशीच्या अंकात गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी अमोल काळे यांच्या छायाचित्राऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची मानहानी केली होती. त्यामुळे श्री. रमेश शिंदे यांची नाहक अपकीर्ती झाल्याने त्यांनी अपकीर्तीकारक छायाचित्र प्रसिद्ध करणारे ‘पुढारी’ वृत्तपत्राचे मालक पुढारी पब्लिकेशन प्रा.लि, संपादक विवेक माधवराव गिरधारी आणि तसेच प्रकाशक अन् मुद्रक डॉ. योगेश जाधव यांच्या विरोधात ५० लाख रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.   श्री. शिंदे यांच्याकडून उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २५ ऑगस्ट २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून ५० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. रमेश शिंदे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी (ताकभाते), कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now