मुंबईमध्ये नाल्यांच्या स्वच्छतेसाठी करणार यंत्रमानवाचा उपयोग

मुंबई – पावसाळ्याच्या कालावधीत रस्ते आणि रेल्वेचे पूल यांच्या खालील नाले स्वच्छ करण्यासाठी येथे यापुढे यंत्रमानवाचा उपयोग करण्यात येणार आहे. अमेरिकेतील पश्‍चिम व्हर्जिनिया येथून हा यंत्रमानव (म्हणजेच यंत्र) आयात करण्यात येणार आहे. या यंत्राची उंची ४२ इंच आणि लांबी १२० इंच असणार आहे. हे यंत्र ३६० अंशात गोल फिरत असल्यामुळे अत्यंत निमुळत्या किंवा अरूंद जागेतही या यंत्राद्वारे स्वच्छता करणे शक्य होणार आहे. या यंत्राची एकावेळी अधिकाधिक ७०० किलो वजनाचा गाळ काढण्याची क्षमता असेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यजल खात्याच्या वतीने देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF