महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

धर्मांतर केलेल्यांना हिंदु प्रवर्गातील शासकीय सवलती देऊ नयेत !

राज्यात धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी का करावी लागते ? शासनकर्त्यांच्या ते लक्षात येत नाही का ?

पंढरपूर, २२ जानेवारी (वार्ता.) – गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा करावा. धर्मांतर केलेल्यांना हिंदु प्रवर्गातील आरक्षण आणि शासकीय सवलती देऊ नयेत, अशा मागण्या राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.

ह.भ.प. बापू महाराज रावकर

या निवेदनात म्हटले आहे, ‘महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर चालू असून धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. अनेक ठिकाणी धर्मांतरित व्यक्ती हिंदु धर्मातील मागासवर्गीय, भटके, आदिवासी, वंचित या प्रवर्गातील शासकीय सवलतींचा लाभ घेऊन अन्य धर्मियांचा प्रसार करत आहेत. त्यामुळे हिंदु धर्मियांची आर्थिक हानी होत असून धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा आणि धर्मांतरितांनी लाटलेल्या शासकीय सवलतींची चौकशी करावी.’


Multi Language |Offline reading | PDF