मदरशांमधून विद्यार्थ्यांवर बिंबवली जात आहे इसिस या आतंकवादी संघटनेची विचारसरणी ! – ‘शिया वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिझवी,

देशभरातील मदरसे बंद करण्याची रिझवी यांची पंतप्रधानांकडे मागणी

  • ‘शिया वक्फ बोर्डा’च्या अध्यक्षांना जे कळते, ते भाजप सरकार, मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच तिस्ता सेटलवाड, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शहा, राजदीप सरदेसाई आदींना का कळत नाही ?
  • मदरशांना कोट्यवधी रुपये अनुदान देणार्‍या भाजप सरकारला सणसणीत चपराक ! ‘मदरशांना अनुदान देणे म्हणजे सरकारी पैशांतून आतंकवादी निर्माण करणे’, असे कोणाला वाटल्यास चूक काय ?
  • कधी वेदपाठशाळांमधून आतंकवादी निर्माण होत असल्याचे वृत्त ऐकले आहे का ? तरीही सरकार वेदपाठशाळांना नव्हे, तर आतंकवादी विचारसरणी पेरणार्‍या मदरशांना अनुदान देते, हे लक्षात घ्या !
  • राष्ट्र आणि धर्म यांसाठी झटणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीची मागणी करणारे पुरो(अधो)गामी, समाजवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे मदरशांमधून आतंकवादी विचारसरणी पेरली जात असल्याविषयी काही बोलत नाहीत कि मदरशांवर बंदीची मागणीही करत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – देशातील मदरशांमधून विद्यार्थ्यांवर इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेची विचारसरणी थोपवण्याचे काम चालू आहे. हे रोखण्यासाठी देशातील सर्व प्राथमिक मदरसे बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘शिया वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. सरकारने जर मदरसे बंद केले नाहीत, तर १५ वर्षांनंतर देशातील अर्ध्याहून अधिक मुसलमान इसिसच्या विचारसरणीचे समर्थक बनतील, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

रिझवी यांनी या पत्रात म्हटले आहे, ‘इसिस ही संघटना जगभरातातील मुसलमानबहुल भागांवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करत आहे. मदरशांमध्ये इस्लामी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करून इस्लामच्या नावावर त्यांना अन्य धर्मियांपासून दूर ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये इसिसचे समर्थक उघडपणे फिरत आहेत. देशात ग्रामीण भागात चालू असलेल्या प्राथमिक मदरशांना मिळणार्‍या अनुदानाच्या लालसेपोटी मुलांचे भविष्य खराब करण्याचा उद्योग सध्या चालू आहे. त्यांना सामान्य शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून देशहितासाठी आणि मुसलमान मुलांच्या भविष्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की, भारतात चालू असलेले मदरसे बंद करावेत.’’


Multi Language |Offline reading | PDF