कर्नाटकात काली नदीमध्ये बोट उलटून ८ जणांचा मृत्यू

नवी देहली – कर्नाटकच्या कारवार येथे काली नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांचा बचाव पथकाकडून शोध चालू आहे. २१ जानेवारीला दुपारी ही घटना घडली.

बोट दुर्घटनेमागील कारण अद्याप समजलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार या बोटीत २४ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मासेमार आणि तटरक्षक दल यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य चालू केले. आरंभी ६ जणांचे मृतदेह हाती लागले. अधिक शोध घेतल्यानंतर आणखी २ जणांचे मृतदेह मिळाले. अद्यापही ८ जण बेपत्ता असून बचाव पथकाकडून त्यांचा शोध चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF