१० दिवसांत ४ कार्यकर्त्यांच्या हत्यांमुळे भाजप संतप्त

हाती सत्ता असतांना हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी काहीही न करणारा आणि विरोधी पक्षात असतांना आंदोलने करत बसणारा भाजप ! अशांवर हिंदूंनी अवलंबून न रहाता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !

भोपाळ – मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या चालू असलेल्या हत्यासत्रांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहेत.

सेंधवा जिल्ह्यातील भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची २० जानेवारीला अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली. मंदसौरमधील प्रल्हाद बंदवार यांचीही काही दिवसांपूर्वीच अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. गुना येथील परमाल कुशवाह यांची हत्या करण्यात आली. ते भाजपचे नेते शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक आहेत. याशिवाय इंदूरमधील भाजपचे नेते संदीप अग्रवाल यांचीही नुकतीच हत्या करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now