सभेला आमचे अवश्य सहकार्य राहील ! – केंद्रीयमंत्री अनंत गीते

खेड येथे २७ जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा

१. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री.अनंत गीते यांना सभेचे निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते

लोटे, २१ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचा हिंदु राष्ट्र-जागृती सभा उपक्रम चांगला आहे. या सभेला आमचे अवश्य सहकार्य राहील. येथील शिवसेनेच्या प्रतिनिधींना मी तशा सूचना देतो, असे मनोगत केंद्रीयमंत्री श्री. अनंत गीते यांनी व्यक्त केले. आज लोटे येथील हॉटेल पॅगोडा येथे समितीच्या वतीने सर्वश्री सुरेश शिंदे, दत्ताराम घाग, संतोष घोरपडे, विनोद गादीकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण दिले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF