माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांचे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील व्याख्यान रहित होऊनही त्यांची भाषणबाजी !

अनुमती नसतांनाही भाषणबाजी करून नियमांचे उल्लंघन करणारे बी.जी. कोळसे-पाटील राज्यघटनेवर बोलणार होते, हा विनोदच नव्हे का ? असे नियमबाह्य वर्तन करणारे कोळसे-पाटील यांनी न्यायमूर्तीपदावर असतांना कशाप्रकारचे निकाल दिले असतील, याची कल्पना येते !

पुणे – येथील फर्ग्युसन महाविद्यालयात नास्तिकतावादी आणि हिंदुत्वाचे कट्टर विरोधक असलेले माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांचे ‘राज्यघटना १९५० ते २०१८’ या विषयावर २१ जानेवारीला आयोजित केलेले व्याख्यान रहित करण्यात आले; मात्र तरीही कोळसे-पाटील यांनी महाविद्यालयाच्या आवारात सभा घेऊन भाषणबाजी केली. त्या वेळी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोळसे-पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, तर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने (अभाविपने) ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या.

‘फर्ग्युसन महाविद्यालय हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून चालवले जाते. महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाला अनुमती देण्याचे अधिकार प्राचार्यांना नाही, तर सोसायटीला आहेत. सोसायटीचे व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्यातील विसंवादामुळे कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाला आधी अनुमती दिली गेली’, असे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF