जेएन्यूमधील देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांचे आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले !

नवी देहली – जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोही घोषणा दिल्याप्रकरणी देहली पोलिसांनी विशेष न्यायालयात प्रविष्ट केलेले आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले, तसेच देहली पोलिसांची कानउघाडणीही केली. ‘नियमानुसार आरोपपत्र प्रविष्ट करण्यापूर्वी सरकारची अनुमती घेणे आवश्यक असतांना पोलिसांनी ती न घेता आरोपपत्र प्रविष्ट केले कसे ?’, असा प्रश्‍न न्यायालयाने पोलिसांना विचारला. (असे पोलीस समाजातील गुन्हेगारी कधीतरी रोखू शकतील का ? – संपादक) देहली पोलिसांनी चूक मान्य करत १० दिवसांत सरकारची अनुमती घेणार असल्याचे सांगितले. जेएन्यूत ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० जणांवर १२०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now