देहली आणि उत्तरप्रदेश राज्यांत २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय

  • कुठे धर्मासाठी वाटेल ते करायला सिद्ध होणार्‍या धर्मांध महिला, तर कुठे राष्ट्र आणि धर्म यांच्याशी काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागणार्‍या बहुतांश हिंदु महिला !
  • गेल्या ७१ वर्षांत आतंकवादाची समस्या सोडवू न शकणारी सर्वपक्षीय सरकारे राज्य करण्याच्या लायकीची आहेत का ? अशांच्या राजवटीत आतंकवादाखाली नागरिक भरडले न गेल्यासच नवल !

अमरोहा – सुरक्षायंत्रणांच्या सतर्कतेमुळे आतंकवादी संघटनांकडून आता आतंकवादी कारवायांसाठी धर्मांध महिलांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याचाच एक भाग म्हणून देहली आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय आहेत, असे वृत्त ‘जागरण’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केले आहे. या धर्मांध महिला आतंकवाद्यांना पाक आणि काश्मीर खोर्‍यातील आतंकवादी यांनी  नेपाळमार्गे भारतात घुसवले असून त्यांच्यावर आतंकवाद्यांच्या ‘स्लीपर सेल’ला (गुप्तपणे कारवाया करणार्‍या गटाला) सक्रीय ठेवण्याचे दायित्व सोपवण्यात आले आहे.

या वृत्तानुसार या महिला आतंकवादी स्फोटके वाहून नेण्यात तर सक्षम आहेतच; पण त्यांना शस्त्रे चालवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या महिला आतंकवाद्यांना त्यांना नेमून दिलेल्या कारवायांविषयी भ्रमणभाषवर बोलण्यास सक्त मज्जाव करण्यात आला आहे. आतापर्यंत अशा ६ महिला आतंकवाद्यांची ओळख पटली आहे. या महिला आतंकवादी पश्‍चिम उत्तरप्रदेशमध्ये वावरत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधून २ संशयित महिलांना कह्यात घेण्यात आले असून त्या दोघीही पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे. (पाकमधील महिला आतंकवादी भारतात घुसेपर्यंत सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक)

(संदर्भ : ‘जागरण’ वृत्तसंकेतस्थळ)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now