भाजप सरकार हटवणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य ! – ममता बॅनर्जी

असे पराकोटीचे सूडाचे राजकारण करणारे नेते या लोकशाहीत मुख्यमंत्री बनतात ! अशा स्वार्थी राजकारण्यांना निवडून देणार्‍या जनतेच्या पदरी दुःख पडल्यास आश्‍चर्य ते काय ? असे नेते असलेली लोकशाही बुडल्याविना रहाणार नाही !

कोलकाता – आमच्यासाठी राजकारणातील इतर प्रश्‍न गौण आहेत. भाजप सरकार हटवणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महासभेत त्या बोलत होत्या. भाजप सरकारच्या विरोधात देशातील १३ विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली असून या महाआघाडीची पहिली महासभा कोलकाता येथे नुकतीच पार पडली.

या महासभेचे आयोजन बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केले होते. या महासभेत माजी पंतप्रधान देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन, तेलुगु देसम पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे जेडीएस्चे मुख्यमंत्री कुमारस्वामी, नेते शरद यादव, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आदी उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी या महासभेला उपस्थित नव्हते; मात्र काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन खरगे हे या सभेस उपस्थित होते.

भाजपचे ३ नेते उपस्थित

या सभेला माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि  खासदार शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे ३ नेते उपस्थित होते. (स्वतःच्या नेत्यांनाही एकसंध राखू न शकणारा भाजप हिंदूंना काय एकसंध राखणार ? – संपादक) हे सर्व जण सध्या भाजपच्या विरोधात आहेत. (अशांवर भाजप कारवाई का करत नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF