(म्हणे) ‘संघ बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतो !’ – मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे मंत्री गोविंद सिंह यांचे हिंदुद्वेषी विधान

  • काँग्रेसच्या मंत्र्यांनी कुठल्या मुसलमान किंवा ख्रिस्ती संघटनांविरुद्ध असे बोलण्याचे धाडस दाखवले असते का ?
  • संघ आतंकवादी संघटना असती, तर असे बोलण्याचे धारिष्ट्य सिंह यांनी केले असते का ?
  • स्वतःचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सातत्याने लक्ष करणार्‍या काँग्रेस सरकारला आता हिंदूंनी त्याची जागा दाखवून द्यावी !

भोपाळ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्रे सिद्ध करण्याचे, स्फोट करण्याचे, हातगोळा सिद्ध करण्याचे, तसेच बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतो, असे हिंदुद्वेषी विधान मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे सहकारमंत्री गोविंद सिंह यांनी केले. मध्यप्रदेशमधील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या एकामागोमाग एक होणार्‍या हत्यांविषयी पत्रकारांनी सिंह यांना प्रश्‍न विचारला. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.

सिंह पुढे म्हणाले, ‘‘मध्यप्रदेशमध्ये भाजपने अनेक गुन्हेगारांना पाळले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने आजारपणाच्या नावाखाली १५ वर्षांपासून सर्व सोयीसुविधा पुरवल्या आहेत.’’ (‘हिंदु आतंकवादा’चे तुणतुणे वाजवण्यासाठी काँग्रेसनेच साध्वींना खोट्या आरोपाखाली अटक करत त्यांचा छळ केला. आता हे सत्य समोर आले आहे. हिंदु साधू-संतांना अपकीर्त करणार्‍या काँग्रेसला हिंदू येत्या निवडणुकीत मतपेटीद्वारे उत्तर देतील ! – संपादक)

हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण ! – भाजप

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘‘गोविंद सिंह यांचे सर्व आरोप हास्यास्पद आणि अज्ञानमूलक आहे. गेल्या ९४ वर्षांपासून सलग कार्यरत असलेल्या एका राष्ट्रवादी संघटनेविषयी अशी वक्तव्ये करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now