भारताने राफेल विमानखरेदीची ५० टक्के रक्कम चुकती केली !

  • स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही संरक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी भारताला अन्य देशांवर अवलंबून रहावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! असे पक्ष राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?
  • गेल्या ७१ वर्षांत संरक्षणक्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवू न शकणारे आतापर्यंतचे शासनकर्ते देश विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत अग्रेसर असल्याचे वारंवार सांगतात !

नवी देहली – भारतीय संरक्षणदलासाठी ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांपैकी ३४ सहस्र कोटी रुपये रक्कम चुकती केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ या कालावधीत राफेल विमाने भारताला मिळणार आहेत.

भारताच्या गरजा पूर्ण करू शकतील, अशा तंत्र आणि साधनांनी युक्त असलेली पहिली १३ विमाने सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत सिद्ध असणार आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये पहिल्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्यानंतर पहिला १५ टक्क्यांचा हफ्ता देण्यात आला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now