हंपी उत्सव साजरा करण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! हिंदूंनो, तुमच्या मंदिरांतील संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालणार्‍या हिंदुद्वेषी कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला वैध मार्गाने विरोध करा !
  • सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !
श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिर

हंपी (कर्नाटक) – जगप्रसिद्ध हंपी उत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारने या वर्षी प्रथमच श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीतील पैसे वापरण्याचा डाव आखला आहे. याशिवाय पुरातत्व विभागाचा पैसाही या उत्सवासाठी वापरण्यात येणार आहे.

एकेकाळी रत्न-मोती यांची रस्त्यावर उघडपणे विक्री करणार्‍या विजयनगरच्या भूमीवर साजर्‍या करण्यात येणार्‍या हंपी उत्सवाला या वेळी दारिद्य्राने ग्रासले आहे. या वर्षी हा उत्सव १६ आणि १७ फेब्रुवारीला साजरा होणार असून त्यासाठी धन गोळा करण्याचे दायित्व जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. दुष्काळाचे कारण पुढे करून शासनाने हा उत्सव रहित करण्याचा विचार केला होता; मात्र कलाकारांनी आक्षेप घेतल्यानंतर हा उत्सव मंदिराच्या पैशांतून साजरा करण्याचे सरकारने ठरवले आहे.

हंपी उत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडे साडेसात कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र ती धुडकावून लावतांना सरकारने जिल्हा प्रशासनालाच निधी उभारण्यास सांगितला. यातील काही रक्कम सरकार देणार असले, तरी अजून लागणारी मोठी रक्कम जमा करण्यासाठी काँग्रेस सरकारने दानपेटीत हात घातला आहे.

‘हंपी येथील श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिरात देश-विदेशांतील भक्तांकडून मोठ्या प्रमाणात धन अर्पण करण्यात येते. हे धन हंपी उत्सवासाठी का वापरू नये ?’, असा प्रश्‍न आमदार वि.एस्. उग्रप्पा यांनी उपस्थित केला होता. याविषयी स्वतः धर्मादाय विभागाचे मंत्री परमेश्‍वर नायक यांनी जिल्हाधिकारी डॉ. रामप्रसाद मनोहर यांच्याशी चर्चा करून हा पैसा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now