म्हापसा येथे एका मासात ३ गायींची अमानुषपणे हत्या

म्हापसा (गोवा), २१ जानेवारी (वार्ता.) – हणजूण येथे फ्ली मार्केटजवळ मागील एका मासात ३ गायींची अमानुषपणे हत्या केली गेली; मात्र या गायींच्या हत्यार्‍याला शोधण्यास पोलिसांना अपयश आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी गायींची हत्या करण्यात येते. गायीचे प्रथम पाय बांधून नंतर तिला गळफास लावला जातो; मात्र ही हत्या कोण करत आहे ? आणि यामागील हेतू काय आहे ? हे कोणाच्याही लक्षात आलेले नाही. या मृत गायींना पुढे स्थानिक पंचायतीच्या साहाय्याने पुरण्यात आले. याविषयी स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अन्वेषण केले.


Multi Language |Offline reading | PDF