परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच साधकांची काळजी घेणार्‍या प्रीतीस्वरूप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

साधिकेच्या तोंडवळ्यावरून तिला त्रास होत असल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी ओळखणे आणि त्यांच्या बोलण्यातून साधिकेला चैतन्य मिळणे

श्रीमती गीता प्रभु

‘मला गेल्या आठवड्यात साधिका कु. प्रियांका जोशी यांनी एक निरोप दिला. त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला त्रास होत असल्याचे जाणवले. त्या तुम्हाला दूरध्वनी करणार आहेत.’’ थोड्या वेळाने मला सद्गुरु बिंदाताईंचा दूरध्वनी आला. त्यांनी मला होत असलेल्या त्रासाविषयी विचारून मला काही नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यातून मला पुष्कळ प्रेम जाणवले. त्या बोलत असतांना मला चैतन्य मिळून हलके वाटू लागले. त्या मला म्हणाल्या, ‘‘आधुनिक वैद्यांना भेटा. त्याप्रमाणे मी आधुनिक वैद्यांना भेटलेही.

वरील प्रसंगापासून ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच सद्गुरु (सौ.) बिंदाताई माझ्या आहेत’, असे मला वाटते. त्यामुळे माझे सेवा न करण्याचे विचार मनातून नाहीसे झाले आहेत. आता मला पुष्कळ सुरक्षित वाटते. परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच मला माझी काळजी घेणार्‍या सद्गुरु बिंदाताई दिल्यात. यासाठी मी तुमच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF