संघनेत्यांची हत्या करण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांना ४ कोटी रुपयांची सुपारी

पाकच्या ‘आयएस्आय’ या गुप्तहेर संघटनेच्या सांगण्यावरून कट रचल्याचे उघड !

  • कथित पुरोगाम्यांच्या हत्यांविषयी आकाशपाताळ एक करणारे आता हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या षड्यंत्राविषयी गप्प का ?
  • हिंदुत्वनिष्ठांना संपवू पहाणार्‍या पाकला भाजप सरकार धडा शिकवत नाही, हे संतापजनक !

नवी देहली – दक्षिण भारतातील संघनेत्यांची हत्या करण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांना ४ कोटी रुपयांची सुपारी दिल्याचे अटकेतील जिहादी आतंकवाद्यांच्या चौकशीत उघड झाले. वली महंमद, रियाजुद्दीन शेख आणि मुहतासिम सीएम् उपाख्य थस्लीम अशी या तिघांची नावे असून ते पाकच्या आयएस्आय या गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून काम करत होते. त्यांना देहलीच्या विशेष पोलीस पथकाने देहलीतून नुकतीच अटक केली होेती. यांतील वली महंमद अफगाणिस्तानचा, शेख हा देहलीचा, तर मुहतासिम हा केरळमधील कासारगौड येथील रहिवासी आहे. हे तिघेही ‘शार्पशूटर’ असल्याचे सांगण्यात आले. अडीच मासांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून नंतर त्यांना अटक करण्यात आली.

संघनेत्यांच्या हत्या घडवून आणण्यासाठी या तिघांना १५ लाख रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती. उर्वरित रक्कम काम झाल्यावर मिळणार होती. त्यांना हॉटेल आरक्षित करण्यासह ४ भ्रमणभाष अन् सीमकार्ड हेही उपलब्ध करून देण्यात आले होते.

या तिघांना साहाय्य करणार्‍या ‘त्या’ चौघांच्या शोधात पोलीस !

पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत आरोपींनी ‘आम्हाला प्रजासत्ताकदिनापूर्वी संघनेत्यांची हत्या करायची होती’, असे सांगितले. त्यापूर्वी रेकी करण्यासाठी एक आठवड्यापूर्वी ते कर्नाटक आणि केरळ येथे जाणार होते. रेकी पूर्ण करून नेत्यांची हत्या करून भूमीगत होण्याची त्यांची योजना होती. पाकमधील कुख्यात गुंड रसूल खान हा या तिघांच्या संपर्कात होता आणि तो सूत्रे हालवत होता. त्याने या तिघांच्या साहाय्याला आणखी ४ जणांना जुंपले होते, अशी माहिती चौकशीतून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या चौघांचा शोध चालू केला आहे. यासाठी केरळ आणि कर्नाटक पोलिसांचे साहाय्य घेतले जात आहे. हॉटेल कोणी आरक्षित केले होते आणि त्यासाठी कुठल्या माध्यमातून पैसा पुरवण्यात आला होता, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.

(संदर्भ : ‘जागरण’ वृत्तसंकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF