लिंगायत समाजाचे गुरु महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचा १११ व्या वर्षी देहत्याग

कर्नाटक सरकारकडून ३ दिवसांचा दुखवटा घोषित

नवी देहली – लिंगायत समाजाचे गुरु तथा कर्नाटकमधील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांनी २१ जानेवारी या दिवशी वयाच्या १११ व्या वर्षी देहत्याग केला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी ३ दिवसांचा दुखवटा घोषित केला.

२२ जानेवारी या दिवशी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. स्वामीजींच्या देहत्यागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्र्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.

महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांनी केले होते वर्ष २०१७ मधील ‘सनातन अ‍ॅण्ड्रॉईड पंचांगा’चे लोकार्पण

महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते वर्ष २०१७ मधील कन्नड भाषेतील ‘सनातन अ‍ॅण्ड्रॉईड पंचांगा’चे लोकार्पण करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF