मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले

प्रत्यार्पणापासून वाचण्याची धडपड

अशा घोटाळेबहाद्दरांना घोटाळा करू देणार्‍या, तसेच त्यांना पसार होऊ देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी, तसेच हिरे व्यापारी मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले. चोकसी यांनी एंटीगुआ येथील भारतीय उच्चायुक्तालयात २१ जानेवारी या दिवशी स्वतःचे पारपत्र जमा केले. नियमानुसार भारतीय नागरिकाने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास त्याला स्वतःचे पारपत्र भारतीय उच्चायुक्तालयात जमा करावे लागते. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच चोकसी यांनी देशातून पोबारा केला होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांना ते हवे आहेत. त्यामुळेच प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याचे बोलले जात आहे. चोकसी हे या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांचे मामा आहेत. नागरिकत्व सोडण्यासाठी चोकसी यांना १७७ अमेरिकी डॉलर्सचा ‘ड्राफ्ट’ जमा करावा लागला.


Multi Language |Offline reading | PDF