उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार

  • खर्‍या साधू-संतांना ओळखण्यासाठी सरकारकडे पात्र व्यक्ती किंवा यंत्रणा आहे का ?
  • ‘राममंदिरावरून साधू-संतांची अप्रसन्नता दूर करण्यासाठी त्यांना ही योजना चालू केली’, असे जनतेने समजायचे का ?

लक्ष्मणपुरी (लखनौ) – भाजपशासित उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार आहे. वृद्धाश्रम पेन्शन योजनेच्या अंतर्गत उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत कक्ष उभारून योजनेत सहभागी होण्यासाठी साधू-संतांना आवाहन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पेन्शन योजनेत साधू-संतांना सहभागी करून घेतले गेले नव्हते; कारण त्यांच्याकडे मूलभूत कागदपत्रे उपलब्ध नव्हती. सरकार आता ही उणीव भरून काढण्यासाठीही प्रयत्नशील आहे.


Multi Language |Offline reading | PDF