लातूर येथे अपघातग्रस्त घायाळ युवकास लुटले

लातूर – येथे भरधाव वाहनाच्या धडकेत घायाळ झालेले दुचाकी चालक चंद्रकांत स्वामी यांना लोकांनी लुटले. अपघातात पायाचा अस्थीभंग झाल्याने ते साहाय्यासाठी याचना करत होते; मात्र काही जणांनी साहाय्य न करता गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी, भ्रमणभाष आणि रक्कम चोरली. पोलिसांनी चंद्रकांत यांना रुग्णालयात नेले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (समाजाची संवेदनाशून्य आणि चोरटी मानसिकता ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF