ही महाआघाडी कि ‘देशबिघाडी’ ?

मोदी सरकारच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी बंगाल येथे १३ राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून उभारलेल्या महाआघाडीचा महामेळावा पार पडला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने ही महाआघाडी स्थापन झाली. या महामेळाव्यात सर्वच पक्षांनी ‘दंगली आणि विद्वेष पसरवणारे, घटनात्मक संस्था मोडून टाकणारे मोदी सरकार आणि भाजप यांना धडा शिकवण्यासाठी, तसेच लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे’, ‘जनतेने दुसर्‍या स्वातंत्र्यासाठी सिद्ध रहावे’, ‘मोदी यांची ‘एक्स्पायरी डेट’ (मुदत) संपली’, असे अकलेचे तारे तोडले.

या १३ पक्षांतील नेतेमंडळींमध्ये फारुख अब्दुला, अखिलेश यादव, शरद पवार इत्यादी धर्मनिरपेक्ष मात्र आयुष्यभर एकाच धर्माचे लांगूलचालन करणार्‍या मंडळींचा समावेश आहे. देशात घोटाळ्यांची परंपरा निर्माण करणारी काँग्रेस, महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘एल्गार परिषदे’त चिथावणीखोर वक्तव्ये करून दंगली भडकवण्याचा आरोप असलेले जिग्नेश मेवाणी, ज्यांचे वडील चारा घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत, ज्यांच्या पक्षाच्या काळात बिहारचे ‘जंगलराज’ झाले ते लालूपुत्र तेजस्वी यादव, स्त्रियांविषयी अभद्र बोलण्याची ज्यांना सवय आहे, नैतिकतेचा ज्यांना लवलेश नाही, असे शरद यादव इत्यादी सहभागी झाले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या कार्यकाळात बंगालमधील हिंदु जनता बांगलादेशात असल्याचा विदारक अनुभव घेत आहे, त्या ममता(बानो) परिवर्तनाची भाषा करत आहेत. त्यांचे असे म्हणणे हे ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ याप्रमाणे झाले.

महाआघाडीतील एकेका पक्षाची कुंडली मांडायची झाली, तर त्यामध्ये हिंदुविरोध, भ्रष्टाचार, अत्याचार, राष्ट्रद्रोह या दुर्गुणांनीच ती भरलेली आहे, असे लक्षात येईल. ‘आप’पासूनच प्रारंभ केला, तर ‘आम आदमी’च्या नावाने चालू झालेली आणि ‘वेगळा पर्याय’ म्हणून नावारूपास आलेली चळवळ ‘आम भ्रष्टाचार’पर्यंत पोहोचली आहे. या पक्षाचे आमदार, पदाधिकारी या ना त्या भ्रष्टाचार, अपप्रकार यांमध्ये गुंतले आहेत. पक्षश्रेष्ठ अरविंद केजरीवाल कधी काय गोंधळ निर्माण करणारे विधान करतील, याचा नेम नाही. पक्षाची फाटाफूट झाली असून तो संपण्याच्या मार्गावर उभा आहे. राष्ट्रद्रोही विधाने आणि कामे यांसाठी ‘नॅशनल कॉन्फरन्स’ कुप्रसिद्ध आहे. अब्दुल्ला पिता-पुत्र सातत्याने पाकचे गोडवे गाणारी आणि भारताचा तिटकारा करणारी विधाने करत असतात. अखिलेश यादव आणि (मुल्ला) मुलायमसिंह यादव या पिता-पुत्रांनी तर उत्तरप्रदेशमध्ये मुसलमानांना एवढे डोक्यावर घेतले होते की, ‘उत्तरप्रदेश’चे नामकरण ‘मुसलमान प्रदेश’ एवढेे करायचेच शेष होतेे. तेथील अनेक हिंदूंना धर्मांधांच्या भीतीमुळे घरातून पलायन करावे लागले होते. गुंडगिरीने उच्चांक गाठला होता. हिंदूंच्या शंकराचार्यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना त्यांच्याच कार्यकाळात पोलिसांच्या लाठीमाराचा सामना करावा लागला. हिंदूंवरील आक्रमणांचे आणि दंगलींचे प्रमाण वाढले होते.

जिग्नेश मेवाणी जिथे जातात, तिथे जातीयवादाला खतपाणी घालण्यास कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या एल्गार परिषदेतील भाषणानंतर महाराष्ट्रात कोरेगाव भीमा येथे दंगल घडल्याचे प्राथमिक अन्वेषण पुणे पोलिसांनी केले होते. त्याविषयी त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. ‘ममता(बानो) या ‘बंगालचे बांगलादेशात रूपांतर करतील’, असे बंगालमधील भाजपच्या प्रमुखाने विधान केले आहे, एवढी भीषण परिस्थिती तेथे आहे. तिथे काही दिवसाआड भाजप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर आक्रमण होत असते. एका दंगलीच्या वेळी तेथील पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाची माहिती देतांना एका पोलिसालाही रडू कोसळले होते. एकंदरित अशा अभद्र राजकीय पक्षांनी केलेली युती म्हणजे ‘देशाचा लवकर विनाश करण्याची केलेली सिद्धता आहे’, असे म्हणावे लागेल.

द्वेषावर आघाड्या !

प्रत्येक पक्ष त्याच्या विचारधारेनुसार काम करतो. या पक्षांच्या ‘अजेंड्या’वर हिंदुहिताचा विचार कधीही आणि कुठेही नसतो. देशावर आणीबाणी लादणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंच्या विरोधी निर्णय घेणार्‍या काँग्रेसने तर ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे म्हणणे हे मोठा विनोद करण्यासारखे आहे. दंगली घडवणे आणि जात्यंधता निर्माण करणे ही या पक्षाची विचारसरणी आहे. देशातील कोट्यवधी जनतेने पाहिलेल्या स्वप्नांची राखरांगोळी कशी करायची, हे काँग्रेसच्या ‘अकबरी’ आणि तृणमूल काँग्रेसच्या ‘औरंगजेबी’ कारभारातून दिसून येते. यांचा उद्देश भाजप हिंदुत्वनिष्ठ म्हणून त्याला घालवणे आणि सत्ता संपादन करणे एवढ्यापुरताच सीमित आहे. पंतप्रधानपदाविषयी मतभेद नाही, असा दावा ते करत असले, तरी नंतरच त्यांचे ‘खरे रूप’ समोर येईल. महाराष्ट्रातही सत्तासंपादनासाठी भारिप बहुजन महासंघ आणि हिंदुविरोधी एम्आयएम् यांची अशीच एक विचित्र आघाडी झाली आहे. मोदीद्वेष आणि भाजपद्वेष यांचे राजकारण करून केलेली ही युती फार काळ टिकणार नाही, हे खरे असले, तरी ती ‘देशबिघाडी’ असल्याने हिंदूंनी सावध होणे आवश्यक आहे.

हिंदुत्वनिष्ठांची राष्ट्रप्रेमी आघाडी हवी !

विचारसरणीत विळी-भोपळ्याचे वैर असलेले पक्ष सत्ता मिळवण्यासाठी मात्र सुतासारखे सरळ होऊन आणि ‘आम्ही एकच आहोत’, या भावनेने एकत्र येतात आणि मतभेद विसरतात. तेव्हा ‘राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान असलेले अन् त्यासाठी काहीना काही कृती करणारे हिंदुत्वनिष्ठ एकत्र येऊन हिंदूंची ‘हिंदू आघाडी’ का निर्माण करू शकत नाहीत ?’, असा प्रश्‍न पडतो. हिंदूंना स्वत:चे असे राष्ट्र नाही, ही मोठी समस्या आहे. परिणामी हिंदू स्वत:च्या देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत. ही विदारक परिस्थिती आहे.

येथे ‘हिंदुत्वनिष्ठांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून जनमत घ्यावे’, असे सांगण्याचा हेतू नाही; मात्र हिंदूंच्या हितासाठी हिंदु संघटनातील अडथळे दूर करण्याची आणि हिंदु राष्ट्र या सामाईक सूत्रासाठी वेगाने कृतीशील होण्याची आवश्यकता यातून सांगायची आहे. कोणताही राजकीय पक्ष सत्तेत आला, तरी हिंदूंच्या स्थितीत काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्रासाठी ‘हिंदू आघाडी’ निर्माण होणे आवश्यक !


Multi Language |Offline reading | PDF