सैन्यदलातील जेवणाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍या सैनिकाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

नवी देहली – सैन्यदलातील जेवणाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून, त्याविषयी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिणारे सैनिक तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. रोहित यादव (वय २२ वर्षे) असे मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह रेवाडीच्या शांती विहार परिसरातील घरात आढळला. याप्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

यादव यांचा मुलगा देहलीत शिक्षण घेत असून तो काही दिवसांसाठी घरी आला होता. यादव सध्या प्रयागराज येथे कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यांची पत्नी संध्याकाळी कार्यालयातून घरी आली असता तिने रोहितच्या खोलीचे दार वाजवले; पण तो दरवाजा उघडत नव्हता. तेव्हा दार जोरात ढकलल्यावर पलंगावर रोहितचा मृतदेह आढळला. रोहितच्या हातात बंदूक होती. या बंदुकीतून त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना मिळणार्‍या जेवणाविषयी यादव यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. या चित्रफितीची, तसेच यादव यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने संबंधित तुकडीच्या वरिष्ठांना जाब विचारणारे पत्र लिहिले होते. कालांतराने तेज यादव यांच्यावर कारवाई झाली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now