शबरीमला प्रकरणी विहिंप देशव्यापी आंदोलन करणार !

  • भाजप सत्तेत असतांनाही जर विहिंपला काँग्रेसमधील राजवटीप्रमाणेच आंदोलन करावे लागत असेल, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यात भेद तो काय उरला ? भाजप सरकारला हे लज्जास्पद !
  • गेल्या साडेचार वर्षांत भाजपने राममंदिर का उभारले नाही, हे त्याने हिंदूंना सांगितले पाहिजे !

नवी देहली – शबरीमला प्रकरणी विहिंप देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती विहिंपचे महामंत्री मिलिंद परांड यांनी दिली. राममंदिराविषयी येथे होणार्‍या धर्मसंसदेत साधू-संत जो निर्णय घेतील, त्याआधारे पुढील कार्याची दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘शबरीमला मंदिराची प्राचीनता आणि धार्मिक परंपरा अबाधित रहायला हवी होती. त्यात विघ्न आणले जाणे अयोग्य होते. अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी चालू असलेल्या न्यायप्रक्रियेतही हिंदूंना फार वाट पहावी लागत आहे. राममंदिराविषयी त्वरित निर्णय होणे विहिंपला अपेक्षित आहे. राममंदिरासाठी कायदा करण्याची मागणी धर्मसंसदेत करण्यात येईल.’’


Multi Language |Offline reading | PDF