उत्तरप्रदेशात हिंदु युवकाची गोळ्या घालून हत्या करणार्‍या धर्मांध युवकाला संतप्त जमावाने ठार मारले !

  • आता पुरोगाम्यांच्या टोळीकडून धर्मांध युवकाच्या गुन्हेगारी वृत्तीकडे दुर्लक्ष करून पुन्हा हिंदूंनाच लक्ष्य केले गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • खरे तर क्षुल्लक कारणावरून अथवा काहीतरी कुरापत काढून हिंदूंचा जीव घेणाऱ्या धर्मांधांमुळेच हिंदूंना भारतात असुरक्षित वाटू लागले आहे; मात्र ‘भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणारे नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे धर्मांध कलाकार याकडे दुर्लक्ष करून हिंदूंना लक्ष्य करतात, हे लक्षात घ्या !
  • भाजपच्या राज्यात हिंदूंची हत्या करण्याइतपत धर्मांध उद्दाम होतात, याचा अर्थ तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच खरे !

संत कबीरनगर (उत्तरप्रदेश) – शहरातील गोविंदगंज बाझार येथे नुकतेच एका धर्मांध युवकाने हिंदु युवकाची गोळी झाडून हत्या केली. धर्मांध युवक घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतांना संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. त्यात तो ठार झाला.

सर्वेश यादव (वय २५ वर्षे) हा तरुण कामानिमित्त गोविंदगंज बाझार येथे आला होता. त्या वेळी सायंकाळी ७ च्या सुमारास सलमान (वय २४ वर्षे) नामक एका युवकाशी त्याची शाब्दिक बाचाबाची झाली. सलमान याने सर्वेश याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. गोळी झाडल्यानंतर श्री. यादव रस्त्यावर कोसळला. त्या वेळी सलमान याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने त्याला पकडले आणि त्याला मारहाण करण्यास आरंभ केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शहरात पोलीस तैनात करण्यात आले असून तेथे तणावपूर्ण शांतता आहे.


Multi Language |Offline reading | PDF