काँग्रेसशासित मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

आठवड्यातील दुसरी घटना

  • स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या एकामागोमाग एक हत्या होत असतांना भाजप केंद्रात सत्तेत बसून काय करतो ? भाजपला या हत्या दिसत नाहीत का ? स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या हत्या हतबलतेने पहात बसणारे भाजप सरकार हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या कधीतरी रोखेल का ?
  • केंद्रात कुठलेही सरकार आले, तरी ते हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखू शकत नाही, हेच हिंदुत्वनिष्ठांच्या एकामागोमाग होणार्‍या हत्यांवरून सिद्ध होते. यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची ‘मॉर्निंग वॉक’च्या वेळी हत्या झाल्याचे सांगून थयथयाट करणारे पुरोगामी, हिंदुत्वनिष्ठ
  • नेत्याची ‘मॉर्निंग वॉक’च्या वेळी हत्या झाल्यावर गप्प का ?

भोपाळ – मध्यप्रदेशमधील सेंधवा जिल्ह्यातील भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची २० जानेवारीला अज्ञातांनी हत्या केली. वलवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज ठाकरे हे ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांचा मृतदेह एका शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड आढळून आला. त्यांचा डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात भाजपच्या नेत्याची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. मंदसौरमधील प्रल्हाद बंदवार यांचीही काही दिवसांपूर्वीच हत्या झाली होती.

काँग्रेसच्या राजवटीत गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे, तर पोलिसांचे अल्प होत आहे ! – भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. भाजपच्या नेत्यांच्या एकामागोमाग एक हत्या घडवून आणल्या जाणे, ही गंभीर गोष्ट आहे. काँग्रेसच्या राजवटीत गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय संरक्षण प्राप्त होण्यास आरंभ झाला आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे, तर पोलिसांचे अल्प होत आहे. काँग्रेस सरकारने या हत्या सहजतेने घेतल्या असून सरकार क्रूर चेष्टा करत आहे. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वांसमक्ष भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची हत्या करण्यात आली. सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडावे अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करील.

भाजपचे मंदसौर येथील नेते प्रल्हाद बंदवार यांच्या हत्येचे सीबीआयद्वारे अन्वेषण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. बंदवार यांची हत्या २५ सहस्र रुपयांसाठी केली, हा तर्क गळी उतरणे कठीण आहे. यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF