भाजप सरकार राममंदिराविषयी अध्यादेश काढेल, असे वाटत नाही ! – विहिंप

  • भाजपला घरचा अहेर ! जे हिंदुत्वनिष्ठ प्रथमपासूनच सांगत होते, ते विहिंपला इतक्या वर्षांनंतर कळले का ?
  • भाजप विश्‍वासार्हता गमावत आहे, याचे हे उदाहरण होय !

प्रयागराज – भाजप सरकार राममंदिराविषयी अध्यादेश काढेल, असे वाटत नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी येथे केले. कुंभक्षेत्री सेक्टर क्रमांक १४ मध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या मंडपामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘याविषयी आम्ही ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या धर्मसभेत सर्व साधू-संतांना अवगत करणार आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

कुमार पुढे म्हणाले, ‘‘राममंदिराच्या उभारणीत काँग्रेस खोडा घालत आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी राममंदिराविषयीची सुनावणी लोकसभेच्या निवडणुकांनंतर घेण्याची मागणी न्यायालयात केली होती.’’ विहिंपच्या धर्मसभेत अनेक मोठे संत उपस्थित रहाणार आहेत. यात राममंदिराच्या उभारणीविषयी पुढील दिशा निश्‍चित करण्यात येणार आहे.

…तर राममंदिराच्या सूत्रावरून काँग्रेसला पाठिंबा देऊ ! – विहिंप

ज्या हिंदुद्वेषी काँग्रेसने ‘राम हे काल्पनिक पात्र आहे’, असे सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे, अशा काँग्रेसला पाठिंबा देण्याचा विचार तरी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मनात कसा येतो ?

आलोक कुमार  या वेळी म्हणाले, ‘‘राममंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्‍वासन दिले आहे, त्यांना विहिंपने पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राममंदिराचे सूत्र निवडणुकीच्या घोषणापत्रात समाविष्ट केले, तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयीही विचार करू. (दिवास्वप्नात रमणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटना ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF