विहिंपकडून रामनवमीपासून राममंदिर उभारण्यास प्रारंभ होणार !

कुंभक्षेत्री विहिंपच्या धर्मसभेत होणार घोषणा

प्रयागराज (कुंभनगरी), २० जानेवारी (वार्ता.) – विहिंप येत्या रामनवमीपासून राममंदिर उभारण्याचा शुभारंभ करणार आहे. त्यासाठी रणनीती निश्‍चित करण्यात आली आहे. विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मसभेत या रणनीतीची घोषणा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी संतांच्या मार्गदर्शनानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

वर्ष २०२५ मध्ये भव्य मंदिर उभारले जाईल. सेक्टर १४ मधील विहिंपच्या अशोक सिंघल नगरमध्ये १९ जानेवारीला विहिंपच्या केंद्रीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत हिंदूंना संघटित करण्यासमवेत अयोध्या येथे राममंदिर उभारण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत धर्मसभेतील विषयांवर अधिक चर्चा झाली. धर्मसभेत संतांकडून मंदिर उभारण्याच्या तिथीची घोषणा होऊ शकते. चैत्र मासातील रामनवमी ही तिथी मंदिराच्या उभारणीसाठी योग्य आहे. यावर संतांचे एकमत झाल्यास रामनवमीपासून मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF