भाजपशासित उत्तरप्रदेशमधील अलीगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार मौलवी बनण्याचे प्रशिक्षण !

  • सैन्यदलातील मौलवीपदासाठी मुसलमान विद्यार्थ्यांना पात्र बनवण्याचा दावा !

  • जुलै मासापासून चालू होणार अभ्यासक्रम !

  • शाळेत भगवद्गीता शिकवण्याच्या सूत्रावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची ‘पुरोगामी’ आरोळी ठोकणारे आता अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या या निर्णयावर ‘शिक्षणाचे हिरवेकरण’ होत असल्याचा आरोप करत नाहीत !
  • किती हिंदु महाविद्यालये विद्यार्थ्यांना पुरोहित अथवा वेदशास्त्रसंपन्न बनवण्यासाठी प्रयत्न करतात ?
  • अलीगड मुस्लिम विद्यापिठातील अनेक विद्यार्थी आतंकवादी कारवायांत गुंतल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. असे असतांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या सैन्यदलात अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भरती केल्यास ती आत्मघातकी गांधीगिरीच ठरणार नाही का ?
  • शाळांत श्री सरस्वतीदेवीची प्रतिमाही न चालणार्‍या भाजप सरकारला मौलवी बनवणारा अभ्यासक्रम चालतो, हे लक्षात घ्या !

लक्ष्मणपुरी (लखनौ) – अलीगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थ्यांना मौलवी बनण्याचे प्रशिक्षण देणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याविषयीचा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी भारतीय सैन्यात मौलवीपदासाठी आवेदन करू शकणार आहेत, असा दावा करण्यात आला आहे. जुलै २०१९ पासून हा अभ्यासक्रम विद्यापिठात अंतर्भूत करण्यात येणार आहे. हा ‘डिप्लोमा कोर्स’ एका वर्षाचा असेल. यासाठी केवळ १० जागा असून त्यांतील ५ महिलांसाठी आरक्षित असतील. हा एक वर्षाचा ‘कोर्स’ केल्यास अनेक मदरशांतील मुलांना सरकारी नोकर्‍या मिळणार आहेत. याशिवाय सैन्य रुग्णालय, कारागृह प्रशासन, तसेच अन्य ठिकाणीही त्यांची नियुक्ती होऊ शकेल.

भारतीय सैन्यात प्रत्येक वर्षी होते पदभरती !

या विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले की, भारतीय सैन्यात प्रत्येक वर्षी ‘धर्मशिक्षक’ (पंडित, मौलवी, पाद्री आदी) पदासाठी भरती करण्यात येते. निवड झालेल्या युवकांना कनिष्ठ अधिकारी पदाचा दर्जा असतो. तथापि हे ज्ञात नसल्यामुळे अनेक मुसलमान युवक या नोकरीपासून वंचित रहातात. हे लक्षात घेऊन आम्ही ‘प्रा. के.ए. निजामी सेंटर फॉर कुरानिक स्टडीज्’ अंतर्गत हा नवीन ‘कोर्स’ चालू करणार आहोत.


Multi Language |Offline reading | PDF