‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधिका आणि त्यांचा पुत्र यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – ‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या २९ ऑगस्ट २०१८ या दिवशीच्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणात ‘संशयित आरोपी परशुराम वाघमारे यांचा मुलगा आदित्य वाघमारे’, अशी चुकीची बातमी प्रसिद्ध करून त्यांची मानहानी केली होती. त्यामुळे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या सौ. मनीषा वाघमारे आणि त्यांचा पुत्र कु. आदित्य वाघमारे यांची नाहक अपकीर्ती झाल्याने त्यांनी अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध करणारे ‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी दैनिकाचे मालक ‘मेसर्स कोलेमन अ‍ॅण्ड कं.लि.’, संपादक श्री. सुदिप्ता बसू, तसेच प्रकाशक आणि मुद्रक श्री. रणजीत जगदाळे यांच्या विरोधात १० लाख रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

सौ. मनीषा वाघमारे यांच्याकडून उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत १२ सप्टेंबर २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून १० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने सौ. मनीषा वाघमारे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी (ताकभाते), कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF