गुरुकृपायोगाचा मार्ग दाखवून असंख्य जिवांना उद्धरणारे परात्पर गुरु डॉ. आठवले!

ऐशा ‘जयंत’ अवतारातून देव अवतरला भूवरी ।

धर्माला येता ग्लानी, जन्म घेतो गं नारायण भूवरी ।
वचनबद्ध श्रीहरि ‘जयंत’ अवतारातून अवतरे भूवरी ॥ १ ॥

सनातन हिंदु धर्म पुनरपि स्थापण्यासाठी ।
अन् समस्त जिवांच्या रक्षणास्तव भूवरी आला जन्मासी ॥ २ ॥

गुरुकृपेचा हा साधनामार्ग असंख्य जिवांस उद्धरसे ।
ऐसे गुरुबळ निर्मितो साधकांत, जे जन्म-मृत्यूचे चक्र तोडती ॥ ३ ॥

त्रेतायुगातील वानरसेनेला मिळे द्वापरयुगातील गीताबळ ।
कलियुगात नामसाधनेतून साधकांना मिळाले गुरुबळ ॥ ४ ॥

ऐशा गुरुबळावर सिद्ध जाहले तुझे साधक ।
राष्ट्र अन् धर्म रक्षण्यास्तव सिद्ध जाहले सारे सेवक ॥ ५ ॥

‘हिंदु राष्ट्र’ आणण्यासाठी साधकांनी धर्मदंड घेतले हाती ।
ऐशा साधकांचे रक्षण गुरुदेव सदैव करती, गुरुदेव सदैव करती ॥ ६ ॥

– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी सेवाकेंद्र (६.५.२०१८)

 


Multi Language |Offline reading | PDF