दक्षिण भारतातील संघनेत्यांवर आक्रमण करण्याचा कट उधळला : ३ धर्मांधांना अटक

  • भारतात दंगली घडवण्याचे होते षड्यंत्र

  • आयएस्आय आणि दाऊद टोळी यांचा हात असल्याचे उघड

  • एरव्ही ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे बरळणारे राजकीय नेते आता ‘आतंकवादी कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेते यांना का लक्ष्य करत नाहीत ?’, याचे उत्तर देतील का ?
  • तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्यांवरून आकाश-पाताळ एक करणारे पुरोगामी, निधर्मी आणि प्रसारमाध्यमे आता हिंदु नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – दक्षिण भारतातील संघनेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या तिघा धर्मांधांना गुप्तचर विभाग आणि देहली पोलीस यांनी अटक केली. वली महंमद, सोनू उपाख्य तहसीम आणि रियाजुद्दीन अशी या तिघांची नावे आहेत. यांतील वली हा अफगाणिस्तानमधील, तर तहसीम आणि रियाजुद्दीन हे अनुक्रमे कासारगौड (केरळ) अन् देहली येथील रहिवासी आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हे आतंकवादी मंदिरांवरही आक्रमणे करण्याच्या सिद्धतेत होते. गुप्तचर यंत्रणेने ३ वर्षांपूर्वीच दक्षिण भारतातील मदिरांवर आक्रमणे होण्याविषयी चेतावणी दिली होती.

या कटात पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय आणि दाऊद टोळी यांचा हात असल्याचेही उघड झाले आहे. संघनेत्यांना लक्ष्य करण्यामागे देशात दंगली घडवण्याचे षड्यंत्रही असल्याचे निष्पन्न झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरील तिघा आरोपींपैकी एक आरोपी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमचा जवळचा असलेला गुलाम रसूल पट्टी याच्याशी संबंधित आहे.

अन्वेषण यंत्रणांनी वरील आरोपींची चौकशी केल्यावर खुलासा झाला की, त्या तिघांकडून दक्षिण भारतातील अनेक संघनेत्यांच्या हत्येचा कट रचला जात होता. यासाठी वली महंमद यास विशेष प्रशिक्षण देऊन काबूलहून भारतात आणण्यात आले होते. या सर्वांच्या मागे गुलाम रसूल पट्टी याचा हात असून तोच या टोळीचे नेतृत्व करत असल्याचे सांगितले जात आहे. गुलाम रसूल पट्टी गुजरात दंगलीतील आरोपी असून वर्ष २००२ पासून तो पसार आहे. गुलाम रसूल पट्टीच्या दूरध्वनीवरील संभाषणावरून हा सर्व कट उघड झाल्याचे यंत्रणांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF