भाजपशी हातमिळवणी करणारे रामकृपाल यादव यांचे हात छाटून टाकावेसे वाटले होते !

लालूप्रसाद यादव यांच्या कन्येचे प्रक्षोभक विधान

अशांवर सरकार कारवाई करणार आहे का ? कि मोठ्या नेत्याची मुलगी म्हणून त्यांच्या विधानाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार ? 

पाटणा – भाजपशी हातमिळवणी करणारे रामकृपाल यादव यांचे हात छाटून टाकावेसे वाटले होते, असे प्रक्षोभक विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या एका कार्यक्रमात केले.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘रामकृपाल यादव हे सध्या केंद्रीयमंत्री असून पूर्वी ते चारा कापणी यंत्रावर काम करत होते. आम्हाला त्यांच्याविषयी आदर होता; मात्र ज्या दिवशी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली, तेव्हा चारा कापायच्या यंत्राने त्यांचे हात छाटून टाकावेसे वाटले होते.’’


Multi Language |Offline reading | PDF