पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणाच्या खटल्यातील सर्व चुकीच्या गोष्टींना त्यांचे नातेवाईकच उत्तरदायी ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘तपासाचे काय ?’ या विषयावरील चर्चासत्र

मुंबई – लहान मुलाने सांगितले म्हणून समीर गायकवाडला पकडले आणि आता सोडले, याला उत्तरदायी कोण ? सारंग अकोलकर आणि विनय पवार हेे पसार आहेत; म्हणून त्यांच्या मागे लागलेले आहात. आता अजून दोघांना पकडले आहे. पूर्वीचे आरोपी निर्दोष घोषित करता, त्यांना दिलेल्या त्रासाविषयी उत्तरदायी कोण ? या खटल्यात हस्तक्षेप करणारे हत्या झालेल्यांचे नातेवाईकच याला उत्तरदायी आहेत. यांच्यामुळे अन्वेषण संथ गतीने होत आहे. चुका होत असतील, तर त्याचे दायित्व हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांनी घ्यायला हवे, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी १८ जानेवारीला ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘लक्षवेधी’ या कार्यक्रमातील ‘तपासाचे काय ?’ या विषयावरील चर्चासत्रात केले.

चर्चासत्रात ‘डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे खुनी कधीच सापडले जाणार नाहीत; कारण देशातील सर्व सत्ता मनुवाद्यांच्या हातात आहे’, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केल्यावर अधिवक्ता पुनाळेकर यांनी त्यांना अतिशय सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले.

या चर्चासत्रामध्ये भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आणि अंनिसचे प्रवक्ते नंदकिशोर तळाशीलकर सहभागी झाले होते.

चर्चासत्रात अधिवक्ता पुनाळेकर यांनी विरोधकांना विचारलेले प्रश्‍न

१. सनातनचा तुम्ही बळी घेतला आहे. पूर्वी जात नव्हती; पण तुम्ही आता ‘सनातन’ नावाची जात निर्माण करत आहात का ?

२. कोरेगाव भिमा प्रकरणातील राहुल फटांगडे यांना मनुवाद्यांनी मारले का ? मनुस्मृति जाळणारे छगन भुजबळ यांना मनुवाद्यांनी कारागृहातून सोडले का ? इंडिया बुलचा मालक मनुवादी आहे का ?

३. ‘कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यडुरप्पा यांनी मुलाचे नाव लिंगायत धर्मानुसार ठेवले पाहिजे; पण  दाभोलकरांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद ठेवले ते कौतुकास्पद आहे’, असे म्हणणार्‍या गौरी लंकेश विवेकवादी कशा ? ‘शंकराच्या पिंडीवर लघवी करू’, असे म्हणणारे कलबुर्गी विवेकवादी कसे ?


Multi Language |Offline reading | PDF